ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2025 महाराष्ट्र – तिसरी निवड यादी प्रसिद्ध | तुमचे नाव येथे चेक करा
भारतीय पोस्टाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी तिसरी मेरिट यादी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर प्रसिद्ध केली आहे. या यादीत विविध राज्यांतील उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. जे उमेदवार पहिल्या व दुसऱ्या यादीत निवडले गेले नव्हते, त्यांनी आता आपले नाव तिसऱ्या यादीत तपासावे.
तिसरी मेरिट यादी – राज्यनिहाय तपशील
ही तिसरी यादी दिनांक 19 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये राज्यनिहाय पात्र उमेदवारांची यादी आहे. यात गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, महाराष्ट्र, ईशान्य राज्ये, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
निवड प्रक्रिया व पुढील टप्पे
या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड त्यांनी अर्ज करताना निवडलेल्या सर्कल आणि दहावीच्या गुणांनुसार केली जाते. तिसऱ्या मेरिट यादीत ज्यांची नावे आहेत, त्यांना आता संबंधित सर्कलमध्ये मूळ कागदपत्रांची पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले जाईल.
India Post GDS 2025 भरती तपशील
भारतीय पोस्ट विभागात एकूण 21,413 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्तर (BPM), व सहाय्यक शाखा पोस्टमास्तर (ABPM) यांचा समावेश आहे.
India Post GDS 3rd Merit List 2025 – डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या -indiapostgdsonline.gov.in
- ‘Candidates Corner’ वर क्लिक करा
- तुमचे राज्य निवडा व ‘Supplementary List – III’ वर क्लिक करा
- PDF उघडल्यावर Ctrl + F वापरून तुमचे नाव शोधा
- यादी डाउनलोड करा व भविष्यासाठी प्रिंटआऊट ठेवा