WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाटबंधारे विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित

पाटबंधारे विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित

पाटबंधारे विभाग (Irrigation Department ) मार्फत सेवानिवृत्त अभियंत्यांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-2, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय अभियंता या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवावा.

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात २६ मे २०२५ पासून झाली असून, १३ जून २०२५ ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट https://wrd.maharashtra.gov.in तसेच अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी.

या भरतीत केवळ सेवानिवृत्त अभियंत्यांनाच अर्ज करता येणार असून, पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. निवड प्रक्रिया फक्त मुलाखतीच्या आधारे होणार आहे.

नोकरीचे ठिकाण: बीड जिल्हा.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ, जिल्हा बीड.

Leave a Comment