WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7वी – 10वी पासवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; येथे अर्ज करा

गट ड संवर्गातील एकूण 86 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 5, विमुक्त जातीसाठी 11, भटक्या जमाती (ब) साठी 3, भटक्या जमाती (क) साठी 2, भटक्या जमाती (ड) साठी 1, इतर मागास वर्गासाठी 16, आर्थिक दुर्बल घटकासाठी 8, ESBC साठी 6, तर खुल्या प्रवर्गातील राखीव जागा 24 आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी कोणतीही जागा राखीव नाही.

या भरतीसाठी पात्रतेच्या अटींपैकी, उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, स्वच्छक पदासाठी किमान 7 वी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जर उमेदवार माजी सैनिक असेल, तर त्याला किमान 15 वर्षे सेवाचा अनुभव आणि दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 26 एप्रिल 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 मे 2025 आहे. अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून फॉर्म भरता येईल:
ऑनलाइन फॉर्म लिंक

परीक्षेचा स्वरूप संगणकाधारित ऑनलाइन असेल. परीक्षेचा तपशील आणि प्रवेशपत्र drscgmcnanded.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल.

परीक्षेसाठी एकूण 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण मिळतील. एकूण परीक्षा 200 गुणांची असेल. प्रश्नांचा दर्जा 10 वी स्तरावरील असेल. प्रश्नविभागन पुढीलप्रमाणे असेल – मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी/अंकगणित 25 प्रश्न.

अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. माजी सैनिक उमेदवारांना शुल्क माफ असेल. सर्व शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक असून बँकेचे अतिरिक्त शुल्क उमेदवारांनी स्वतः भरायचे आहे. एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.

पदभरतीत एकूण 86 पैकी 69 पदे गट ड (सर्व संवर्ग) साठी असून उर्वरित 17 पदे प्रयोगशाळा परिचर पदासाठी आहेत. गट ड सर्वसाधारण पदांसाठी वेतनश्रेणी S1 (₹15000-47600) असून, प्रयोगशाळा परिचर पदासाठी S6 (₹19900-63200) वेतनश्रेणी लागू आहे. यामध्ये नियमानुसार महागाई भत्ता व इतर भत्ते मिळतील.

Leave a Comment