लाडकी बहिण योजना : या लाडक्या बहिणींकडून सरकार करणार 13,500/- रुपयांची वसुली
महाराष्ट्र सरकारने गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून “लाडकी बहिण योजना” सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र आता समोर आलेल्या माहितीने खळबळ उडाली आहे – तब्बल 2,652 महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा गैरफायदा घेतला आहे.
या महिला सरकारी नोकरीत असूनही, नियम धाब्यावर बसवून त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आणि महिन्याला 1500 रुपये घेतले. गेल्या 9 महिन्यांत त्यांनी मिळून 13,500 रुपये उचलले असून एकूण रक्कम 3 कोटी 58 लाखांवर गेली आहे.
सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, एक लाख 60 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अनेकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आले आहे. आता आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची माहिती तपासली जाणार आहे, त्यामुळे फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दोन योजनांचा एकाचवेळी लाभ
फक्त लाडकी बहिण योजना नव्हे, तर अनेक महिलांनी “नमो शेतकरी सन्मान योजना”चाही लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. अंदाजे 8 लाख 85 हजार महिलांनी दोन्ही योजनांचा लाभ घेतला असून, दरवर्षी नमो योजनेतून 12,000 रुपये आणि लाडकी बहिण योजनेतून 13,500 रुपये घेतले आहेत.
सरकारने आता या महिलांकडून सर्व रक्कम परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय कर्मचारी असूनही गरीबांसाठी असलेल्या योजनांचा गैरवापर केल्याने या प्रकारावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.