WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या लाडक्या बहिणींना मिळणार नाही; 1500/- रू. पुढील हप्ता, कारण पहा

महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. सरकारने २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आतापर्यंत या योजनेचा सातवा हप्ता जमा झाला आहे. काही निकष बदलण्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र मंत्री आदिती तटकरे यांनी कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. Ladki bahin yojana

योजनेचे निकष आणि पात्रता

  • अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  • महिलांचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने इन्कम टॅक्स भरलेला नसावा.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

एकाच योजनेचा लाभ

जर महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत असतील, तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.

अर्ज पडताळणी प्रक्रिया

सरकार अर्जांची पडताळणी करत असून अपात्र महिलांचे अर्ज नाकारले जातील. अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत. अपात्र असणाऱ्या महिलांनी योजनेतून माघार घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment