…तरच मिळतील PM किसान योजनेचे 2000 रुपये, हे काम पटकन करा
तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारकडून 1 मे ते 31 मे 2025 दरम्यान PM किसान एनरोलमेंट ड्राइव्ह राबवण्यात येत आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या मोहिमेचा उद्देश असा आहे की, देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ मिळावा.
या मोहिमेमध्ये केवळ जुन्या लाभार्थ्यांची माहिती पडताळून पाहण्यात येणार नाही, तर अद्याप नोंदणी न केलेल्या नव्या शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला गावपातळीवर ही मोहीम यशस्वी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
PM-KISAN योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक गोष्टी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील तीन गोष्टी 31 मे 2025 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- ई-केवायसी (eKYC) करणे
- बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे
- जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करणे
eKYC कसे करावे?
शेतकरी स्वतःच आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी करू शकतात. कोणत्याही एजंटची गरज नाही.
- Google Play Store वरून PM-Kisan Mobile App डाउनलोड करा.
- आधार क्रमांक व लाभार्थी ID टाकून लॉग इन करा.
- रजिस्टर्ड मोबाइलवर आलेला OTP टाका.
- Face Authentication वापरा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करा.
२०वी हप्ता कधी येणार?
PM किसान योजनेचा २०वा हप्ता जून 2025 मध्ये येण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तीन महिन्यांनी रु. 2000 ची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते (DBT प्रणालीद्वारे).
फेब्रुवारी 2025 मध्ये १९व्या हप्त्यासाठी 22,000 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.
लाभार्थी असल्याचे कसे तपासावे?
- लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी:
- अधिकृत वेबसाइटवर जा: www.pmkisan.gov.in
- उजव्या बाजूला “Know Your Status” वर क्लिक करा
- नोंदणी क्रमांक व कॅप्चा टाकून “Get Data” वर क्लिक करा
- लाभार्थी यादीत आपले नाव तपासण्यासाठी:
- वेबसाइटवर “Beneficiary List” वर क्लिक करा
- राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडा
- “Get Report” वर क्लिक करा
संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमांक:
155261 किंवा 011-24300606
या संधीचा लाभ घ्या आणि PM-KISAN योजनेत सहभागी होऊन दरवर्षी रु. 6,000 ची आर्थिक मदत मिळवा.