रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे 2025 साली असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 10 एप्रिल 2025 पासून सुरु होणार असून, 09 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण 9900 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
वेबसाईट | येथे क्लिक करा |
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. अनुसूचित जाती (SC)/अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
परीक्षा फी बाबत बोलायचे झाले तर, सामान्य प्रवर्ग (General), ओबीसी (OBC) आणि आर्थिक दुर्बल घटक (EWS) गटातील उमेदवारांसाठी ₹500, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ExSM), ट्रान्सजेंडर, आर्थिक मागासवर्ग (EBC) आणि महिला उमेदवारांसाठी ₹250 परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900/- इतका प्रारंभिक पगार दिला जाईल. नियुक्ती संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते.
शैक्षणिक पात्रता संदर्भात अद्याप अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही; ती लवकरच उपलब्ध होईल. अर्ज करण्यासाठी आणि अधिकृत माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी www.rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.