WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षांसाठी 10वी – 12वी च्या विद्यार्थ्यांना वाढीव वेळाबाबत सूचना पत्रक जारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळाबाबत सूचना

फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून राज्यातील इयत्ता १०वी (एसएससी) व इयत्ता १२वी (एचएससी) परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांच्या उत्तर लेखनासाठी निर्धारीत वेळेनंतर १० मिनिटांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षांसाठी देखील लागू राहील.

परीक्षा वेळापत्रक व वितरण सूचना

  1. सकाळ सत्र: सकाळी ११:०० वाजता
  2. दुपार सत्र: दुपारी ३:०० वाजता

या वेळेत प्रश्नपत्रिका परीक्षा दालनात वितरित केल्या जातील. यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका देण्यात येणार नाहीत याची दक्षता घेतली जावी.

लेखन कार्य व उत्तरपत्रिका गोळा करण्याच्या सूचना

  • परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वितरण ज्या क्रमाने होईल त्याच क्रमाने परीक्षा समाप्तीनंतर उत्तरपत्रिका गोळा कराव्यात.
  • प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी आणि उत्तर लिहिण्यासाठी निर्धारीत वेळेनंतर १० मिनिटे वाढवून देण्यात यावेत.

सुधारीत घंटेचे नियोजन

परीक्षेच्या कालावधीत दिलेल्या घंटांच्या नियोजनात सुधारणा करण्यात आली असून त्या सूचना परीक्षादालन पर्यवेक्षकांना देण्यात याव्यात.

महत्त्वाची सूचना

वरील नियमांचे काटेकोर पालन करावे आणि परीक्षेच्या सुव्यवस्थित आयोजनासाठी दक्षता घ्यावी.

फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षांसाठी 10वी - 12वी च्या विद्यार्थ्यांना वाढीव वेळाबाबत सूचना पत्रक जारी

Leave a Comment