युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 पदांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 पदांसाठी भरती

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 500 रिक्त जागांसाठी ही भरती होणार असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 30 एप्रिल 2025 पासून सुरू होत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मे 2025 आहे.

पदाचे नाव व एकूण जागा

या भरतीअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) पदाच्या एकूण 500 जागा रिक्त आहेत.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारत सरकार किंवा संबंधित नियंत्रक संस्थेने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून पूर्णवेळ/नियमित पदवी (Bachelor’s Degree) असणे आवश्यक आहे.
तसेच, B.E./B.Tech/MCA/M.Sc (IT)/MS/M.Tech/5 वर्षांचा एकत्रित M.Tech (Computer Science Engineering, IT, Electronics, Electronics & Computer Science, Electronics & Telecommunications, Data Science, Machine Learning & AI, Cyber Security) या क्षेत्रांमधील पूर्णवेळ पदवी असलेले उमेदवार पात्र ठरतील.

वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 22 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे.

वेतनश्रेणी
सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी वेतनश्रेणी खालील प्रमाणे असेल
₹48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच करावयाचा आहे. अर्ज अपूर्ण असल्यास तो अमान्य केला जाईल. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

  • SC/ST/PwBD उमेदवारांसाठी – ₹177/-
  • इतर सर्व उमेदवारांसाठी – ₹1180/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 30 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख – 20 मे 2025

टीप: अधिक माहिती व अटींसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात नीट वाचावी. ही संधी तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून अधिकाधिक उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळेल.

Leave a Comment