WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AAI ATC recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी, मासिक वेतन – 40,000/- रुपये

AAI ATC recruitment 2025 : एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) मार्फत एकूण 309 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पात्र उमेदवारांसाठी एक उत्तम करिअर संधी ठरू शकते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असून 24 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
संकेतस्थळयेथे क्लिक करा

सूचना : सदर भरतीसाठी उमेदवारांनी PDf जाहिरात वाचूनच अर्ज करावा. कोणत्याही नुकसानीस msmarathi.in जबाबदार राहणार नाही.

वयोमर्यादा : 24 मे 2025 रोजी कमाल 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. आरक्षणानुसार SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC (NCL) साठी 3 वर्षे, PwBD साठी 10 वर्षे आणि माजी सैनिक/AAI कर्मचाऱ्यांसाठी 5 ते 10 वर्षांची सूट आहे.

मासिक वेतन : या पदासाठी मूळ वेतन ₹40,000 – ₹1,40,000 असून एकूण CTC सुमारे ₹13 लाख प्रतिवर्ष आहे. यामध्ये DA, HRA, CPF, ग्रॅच्युईटी, वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्त्यांचा समावेश आहे. नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना 3 वर्षांची सेवा देणे बंधनकारक आहे आणि त्यासाठी ₹7 लाखांचा बॉन्ड साईन करावा लागेल. तसेच ICAO लेव्हल 4 इंग्रजी प्रावीण्य परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

अर्ज शुल्क सामान्य प्रवर्गासाठी ₹1000 असून SC/ST/PWD/महिला/AAI अप्रेंटिस उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज भरताना सर्व कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी PDF स्वरूपात तयार ठेवाव्यात.

AAI Junior Executive (ATC) भरती 2025 ही एक अशी संधी आहे जी एव्हिएशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खास आहे. अधिक माहितीसाठी वरील ठिकाणी दिलेल्या AAI च्या अधिकृत संकेतस्थळाला www.aai.aero ला भेट द्या आणि “Careers” विभागामधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज भरण्यास विसरू नका!

Leave a Comment