लाडकी बहीण योजना : मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आज खात्यात जमा होणार!

लाडकी बहीण योजना : मे महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता आज खात्यात जमा होणार!

लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी लागणारा निधी आदिवासी विभागाकडून महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

३३५ कोटींचा निधी वर्ग

या योजनेसाठी सुमारे ३३५ कोटी ७० लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

मे महिना संपायला अवघे काही दिवस उरले असल्याने, या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मे महिन्याच्या 30-31 तारखेपर्यंत १५०० रुपये हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

मे आणि जूनचा हप्ता एकत्र मिळू शकतो

जर हप्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंत जमा झाला नाही, तर मे आणि जून या दोन्ही महिन्यांचा मिळून एकत्रित हप्ता म्हणजेच ३००० रुपये मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या चर्चेनुसार या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होतील, अशी शक्यता आहे.

Leave a Comment